
Ganpati Visarjan 2025
Sakal
अनिल कदम
देगलूर : देगलूरनगरीत लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व भक्त शनिवारी (ता.६) सकाळपासून सज्ज झाले होते. आरती, महाप्रसाद वाटप, वाहनाची सजावट,ढोल, ताशा, लेझिम पथकासह नियोजन करण्यात आले होते . दुपारी बारा वाजता येथील मानाच्या गणपतीची पूजा आमदार जितेश आंतापूरकर यांच्या हस्ते करण्यात येऊन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.