लाखो महिलांची चुलीच्या धुरातून सुटका

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 जानेवारी 2019

जिल्ह्यात १ लाख ४ हजार १६१ कुटुंबांना ‘उज्ज्वला’ची जोडणी
औरंगाबाद - गरजू कुटुंबांतील महिलांना स्वस्तात गॅसजोडणी देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या उज्ज्वला योजनेने जिल्ह्यात लाखाचा टप्पा गाठला आहे. गेल्या अडीच वर्षांत या योजनेतून जिल्ह्यातील एक लाख ४ हजार १६१ कुटुंबांना गॅसजोडणी देण्यात आली आहे. यापैकी तब्बल ७६ टक्के कुटुंबांना जोडणीसाठी कर्जपुरवठा केला असल्याची माहिती मंगेश गॅस सर्व्हिस यांच्यातर्फे देण्यात आली आहे. 

दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना गॅसजोडणी देण्यासाठी केंद्र सरकारने एक मे २०१६ पासून उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. योजनेत मार्च २०१९ पर्यंत पाच कोटी जोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. येत्या काळात योजनेचा लाभ सर्वांना देण्यासाठी तिची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. 

यातूनच उज्ज्वला गॅस योजना टप्पा दोन सुरू होणार असून, योजनेत पूर्वीच्या सात संवर्गांशिवाय अन्य घटकांतील गरजू कुटुंबांनाही लाभ देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने घेतला आहे.

५ किलोंचे सिलिंडर 
उज्ज्वला योजनेतून गॅसजोडणी घेतलेल्यापैकी जिल्ह्यातील साडेआठ टक्के ग्राहकांनी एकदा जोडणी घेतल्यानंतर पुन्हा सिलिंडर भरून घेतले नाही. गरीब कुटुंबाला एलपीजी सिलिंडर घेणे परवडण्यासाठी उज्ज्वला ग्राहकांसाठी तेल कंपन्यांनी १४.४ किलो सिलिंडरऐवजी पाच किलोंचे सिलिंडर बदलून घेता येणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gas Connection Ujjawala Scheme Central Government