Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

Three Domestic LPG Cylinders Seized: शहरात वाढलेल्या गॅस सिलिंडर तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर बुढीलेन परिसरात पुरवठा विभागाची कारवाई करण्यात आली. हॉटेलमधून घरगुती वापराचे तीन सिलिंडर जप्त करण्यात आले असून गॅस काळाबाजार प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Sambhajinagar LPG News

Sambhajinagar LPG News

esakal

Updated on

बुढीलेन: शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याचे ‘सकाळ’ने उदाहरणासह दाखवून दिले. काळाबाजार होत असल्याचा प्रश्नही उपस्थित केला. त्याची दखल घेत अखेर पुरवठा विभागाने रविवारी (ता. १५) लाजेकाजेस्तव कारवाई केली. चार अधिकाऱ्यांच्या पथकाने बुढीलेन परिसरात कारवाई करीत एका हॉटेलमधून घरगुती वापराचे तीन सिलिंडर जप्त केले, त्यातही दोन रिकामेच होते. याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com