

Parbhani News Gas Cylinder Leak Causes House Fire In Ukkalgaon Four Injured Including Woman During Installation
sakal
-सत्यशील धबडगे
मानवत : मानवत तालुक्यातील उक्कलगाव येथे मंगळवारी (दि. ४) सकाळी सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडर बसवित असताना गॅस गळती होऊन अचानक आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत चार भाजले असून . महिला 30 टक्के भाजली आहे तर कुटुंबातील ज्येष्ठाच्या पायाला दुखापत झाली आहे.