गॅस सिलींडरच्या ट्रकने दुचाकीस्वारला चिरडले

योेगेश पायघन
शनिवार, 21 डिसेंबर 2019

गॅस सिलेंडर घेवून जात असलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले. हा अपघात शनिवारी (ता. 21) दुपारी एक ते दीडदरम्यान सिडको बसस्थानक ते हर्सुल टि पाईन्ट रस्त्यावर असलेल्या आंबेडकर चौकात घडला. योगेश जनार्दन गाडवे (वय 34, रा. संभाजी कॉलनी, जाधववाडी) असे मृताचे नाव आहे.

औरंगाबाद : गॅस सिलेंडर घेवून जात असलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले. हा अपघात शनिवारी (ता. 21) दुपारी एक ते दीडदरम्यान सिडको बसस्थानक ते हर्सुल टि पाईन्ट रस्त्यावर असलेल्या आंबेडकर चौकात घडला. योगेश जनार्दन गाडवे (वय 34, रा. संभाजी कॉलनी, जाधववाडी) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश गाडवे, अडिच वर्षाचा सिद्धार्थ राजू गाढवे आणि भाऊ राजू गाडवे यांच्या समवेत दुचाकीवर (एमएच-20-एफबी-0507) बळीराम पाटील शाळेकडून सिडको बसस्थानक चौकाकडे जात होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या गॅस सिलेंडरने भरलेल्या ट्रकने (एमएच 18 बीजी 1599) गाडवे यांच्या दुचाकीस आंबेडकरनगर चौकात धडक दिली. त्यात दुचाकीवर पाठीमागे बसलेला योगेश गाडवे याच्या डोक्‍यावरून ट्रकचे मागचे चाक गेल्याने ते रस्त्यावर चिरडल्या गेले. या उपघातात राजू व सिद्धार्थ हे दुसऱ्या बाजुला पडल्याने जखमी झाले.

हेही वाचा ः औरंगाबादेत शांततेचे वातावरण

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच सिडको पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यांसह पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी पोहचल्या. तोपर्यंत संतप्त जमावाने ट्रकच्या काचा फोडल्या होत्या. दर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर पोलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या योगेश गाडवे याला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी त्यास तपासून मृत घोषीत केले.

याप्रकरणी राजू गाढवे यांच्या फिर्यादीवरुन चालक गोपाल प्रल्हाद क्षिरसागर (वय 40, दिक्षीतवाडी, जळगाव) या ट्रकचालकावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी चालक गोपाल क्षिरसागर अटकेत असून ट्रक पोलीसांनी ताब्यात घेतला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप पाटील हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gas cylinder truck slammed two-wheeler in Aurangabad