
औंढा नागनाथ येथे शिक्षक कॉलनी जवळ एका शेतामध्ये शेतकऱ्याचा आखाड्यावर गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन आखाडा पूर्णपणे जळून नुकसान झाल्याची घटना रविवारी (ता.सहा) घडली. आखाडा बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
औंढा नागनाथ : शिक्षक कॉलनी जवळ एका शेतामध्ये शेतकऱ्याचा आखाड्यावर गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन आखाडा पूर्णपणे जळून नुकसान झाल्याची घटना रविवारी (ता.सहा) घडली.
औंढा येथील शिक्षक कॉलनी जवळ शेतातील आखाड्यामध्ये शेतकरी नारायण लोखंडे, माधव लोखंडे हे राहतात. रविवारी कुटुंबातील काही जण शेतात काम करीत असताना सायंकाळी चारच्या सुमारास गॅसच्या टाकीने पेट घेतला. त्या वेळी घरामध्ये कोणीही नव्हते. माधव आणि नारायण हे दोघे जवळाबाजार येथे बाजारामध्ये भाजीपाला विक्रीसाठी गेले. गॅसच्या टाकीने पेट घेतल्यावर आगीने रौद्र रूप धारण केले.
हेही वाचा - नांदेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, रक्तदान शिबीराचेही आयोजन
मोटारद्वारे पाणी टाकण्याचा प्रयत्न
घटनास्थळी बोध्दाचार्य कपिल साखरे व नगरसेवक राम नागरे हे दाखल झाले व त्यांनी मोटारद्वारे पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनी नगरपंचायत अग्निशामक दलास बोलावण्यात आले मात्र तोपर्यंत आगीमध्ये सर्व साहित्य जळून खाक झाले. पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे हे सर्व पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनीही आग विझवली. आखाडा बघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
हेही वाचा - हिंगोलीत ९९ ग्रामपंचातंर्गत २५९ कामावर १५०३ मजुरांकडून कामे सुरू
शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान
जे ते लहान मोठे हाताला येईल त्याने पाणी टाकण्याचा प्रयत्न सर्व नागरिक करत होते. तसेच या आगीमध्ये नारायण लोखंडे व माधव लोखंडे यांचा आखाडा तसेच सुलोचना पाराजी मस्के व सुजिता माधव मुळे यांच्या शेळ्यांचे शेड जळून खाक झाले. ही घटना गॅसच्या स्फोटने झाली. तसेच या घटनास्थळी राम मुळे, नगरसेवक गणेश देशमुख, नगरसेविका सीताताई नागरे हे देखील दाखल झाले होते. आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली होती.
संपादन ः राजन मंगरुळकर