लग्नाला गर्दी जमवली : भटजी-सोकान्यावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 March 2020

माजलगाव शहरालगतच असलेल्या ब्रम्हगाव येथे गुरुवारी (ता. 19) दुपारी लग्नासाठी गर्दी जमविल्याप्रकरणी नवरीचे वडील, नवरदेवाची आई, नवरदेवाचे मामा, नवरीचा मामा, सोकान्या, लग्न लावणाऱ्या भटजीसह आठ जणांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बीड : माजलगाव शहरालगतच असलेल्या ब्रम्हगाव येथे गुरुवारी (ता. 19) दुपारी लग्नासाठी गर्दी जमविल्याप्रकरणी नवरीचे वडील, नवरदेवाची आई, नवरदेवाचे मामा, नवरीचा मामा, सोकान्या, लग्न लावणाऱ्या भटजीसह आठ जणांविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश लागू केलेले आहेत. असे असतांना विवाह समारंभानिमीत्त शहरालगतच असलेल्या ब्रम्हगाव येथे विठ्ठल पांडुरंग कांबळे यांनी मुलीच्या विवाहानिमित्त गर्दी जमा केली असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक सुरेश बुधवंत यांच्या पथकाने तात्काळ लग्नस्थळी धाव घेतली.

वैजापुरातून कोरोना संशयित गायब

यावेळी लग्नानिमीत्त गर्दी जमविल्याप्रकरणी विठ्ठल पांडुरंग कांबळे रा. ब्रम्हगाव (नवरीचे वडील), मनकर्णा सुभाष पाटोळे (नवरदेवाच्या आई), ज्ञानेश्वर उध्दव पाटोळे (नवरदेवाचा चुलता), चंदु महादेव आठवे (नवरदेवाचे मामा), कैलास सुदाम कसाब (नवरीचे मामा), सुनिल सुदाम वैराळ (नवरदेवाचा सोकान्या), स्वप्नील अनिल कुलकर्णी (भटजी), गणेश आनंत मारगुडे या आठ जणांविरूध्द अविनाश अशोक राठोड सहाय्यक पोलिस निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार श्री. पवार हे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gathering In Majalgaon For Marriage Offence Charged Beed News