esakal | गौतम बुद्ध, डॉ. आंबेडकरांच्या विचारांची कास धरा- आनंदराज आंबेडकर
sakal

बोलून बातमी शोधा

Anandraj Ambedkar

विषमतावादी विचारसरणीचा नायनाट करण्यासाठी संघटित होऊन तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरन करा, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी केले. कळमनुरी तालुक्‍यातील कामठा फाटा( येलकी) येथील तक्षशीला अखिल भारतीय बौद्ध धम्‍म परिषदेचे उद्‌घाटन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्‍ते झाले. या वेळी ते बोलत होते.

गौतम बुद्ध, डॉ. आंबेडकरांच्या विचारांची कास धरा- आनंदराज आंबेडकर

sakal_logo
By
विनायक हेंद्रे

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान सक्षम असताना देशात संविधानास विरोध चालू आहे. या विषमतावादी विचारसरणीचा नायनाट करण्यासाठी संघटित होऊन तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरन करा, मी सैदव तुमच्या सोबत असल्याची ग्वाही रिपब्लिकन सेनेचे प्रमुख तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी शनिवारी (ता. २२) दिली.

कळमनुरी तालुक्‍यातील कामठा फाटा( येलकी) येथील तक्षशीला अखिल भारतीय बौद्ध धम्‍म परिषदेचे उद्‌घाटन आनंदराज आंबेडकर यांच्या हस्‍ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, आनंदराज नेरलीकर, मराठवाडा अध्यक्ष माधव जमधाडे, जिल्‍हाध्यक्ष किरण घोंगडे यांची उपस्‍थिती होती. 

हेही वाचामराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला नक्कीच माहित नसणार...

संघटीत होण्याची गरज 

या वेळी बोलताना श्री. आंबेडकर म्‍हणाले, ‘‘देशात सविंधानाचा विरोध सुरू आहे. यासाठी संघटीत होण्याची गरज असून तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण सर्वांनी केले पाहिजे.’’ धम्‍म परिषदेच्या पहिल्या सत्रात भदंत महाकाश्यप, भदंत धम्‍मदीप, भदंत मुदितानंद यांचे प्रवचन झाले. या वेळी पोलिस उपनिरीक्षक सविता बोधनकर, प्रजासत्ताक पार्टीचे पंकज शिवभगत, प्रा. उत्तम बलखंडे, यशवंत पंडित, आनंद पंडित, देविदास ढेपे आदींची उपस्‍थिती होती. 

पदाधिकाऱ्यांचा पुढाकार

प्रास्‍ताविक आयोजक शंकर बगाटे यांनी केले. सूत्रसंचालन विठ्ठल पंडित यांनी केले. कार्यक्रमासाठी गौतम दुधमल, बबलू घोडगे, सुदेश घोडगे, संतोष इंगोले, बंटी रणवीर, मुन्ना भुक्‍तर, प्रकाश बगाटे, भैय्या बलखंडे, राहुल नरवाडे, प्रशांत पाईकराव, करण इंगोले, बाळू धुळे, विक्रांत नरवाडे, धम्‍मपाल नरवाडे, प्रवीण नरवाडे, राजू गंगाळे, गजानन मोरे, सोपान वाठोरे आदींनी पुढाकार घेतला.

येथे क्लिक करा रात्रीच्या अपघातांची पोलिसांना धास्ती

जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

हिंगोली : देशात धार्मिक मुद्दे उपस्थित करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून यावर राजकारण केले जात असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी शनिवारी (ता.२२) आयोजित पत्रकार परिषदेत केला. या वेळी आनंद नेरलीकर, रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय वाकोडे, माधवराव जमदाडे, किरण घोंगडे आदींची उपस्‍थिती होती. या वेळी बोलताना श्री. आंबेडकर म्‍हणाले, ‘‘नागरिकत्‍व कायद्यामुळे जाती जातीत तेढ निर्माण केली जात आहेत. राजकीय फायद्यासाठी त्‍याचा वापर केला जात आहे. रामजन्म भूमीचा मुद्दा संपल्याने आता जाती जातीत तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. सध्या देशात बेरोगाराच्या हाताला काम देणे महत्‍वाचे आहे. देशात चुकीच्या धोरणामुळे अनेक कंपन्या डबघाईस आल्या आहेत.’’ 


 

loading image
go to top