georai nagarparishad
sakal
गेवराई - मुंबईत होत असलेल्या नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीकडे गेवराईकरांचे लक्ष लागले होते. त्यानूसार आज सोडत झाल्यानंतर गेवराई नगर परिषदेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलासाठी राखीव झाले आहे.
आरक्षण जाहीर होताच शहरात दिवाळी साजरी करण्यात आली. आता राजकारणात नवीन समीकरणांची चर्चा सुरु झाली असून, सोशल मीडियावर भावी नगराध्यक्षा अशा आशयाचे बॅनर मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत आहेत.