Godavari Flood: जायकवाडी धरणातून सव्वा दोन लाखांहून अधिक क्युसेक पाणी विसर्ग; गेवराईतील ४४ गावांमध्ये महापूराचा अलर्ट
Georai Villages: जायकवाडी धरणातून सव्वा दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्याने गेवराईतील ४४ गावांना महापुराचा धोका निर्माण झाला असून प्रशासनाने नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर सुरू केले आहे. सिंदफणा नदीही धोक्याच्या पातळीवर असून सतर्कता वाढविण्यात आली आहे.
गेवराई : जायकवाडीच्या धरणातून आज रविवार पासून तब्बल सव्वा दोन लाखांहून आधिक क्युसेकने गोदावरी नदीच्या पात्रातुन पाणी विसर्ग होत असल्याने गेवराईच्या नदीच्या काठावरील गावांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.