Sarpanch Mangesh Sable News: गुंडगिरी, दहशत व शासकीय कामात अडथळा? आंदोलक सरपंच मंगेश साबळेंना छत्रपती संभाजीनगर-जालना जिल्ह्यातून दोन वर्षे हद्दपारीची कारणे दाखवा नोटीस

गुंडगिरी, दहशत आणि शासकीय कामात अडथळ्याच्या आरोपांवरून सरपंच मंगेश साबळेंविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत दोन वर्षांच्या हद्दपारीची प्रस्तावित कारवाई; पाच दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश
A show-cause notice has been issued to Gevarai Payga sarpanch Mangesh Sable, proposing his externment for two years over allegations cited by the police.

A show-cause notice has been issued to Gevarai Payga sarpanch Mangesh Sable, proposing his externment for two years over allegations cited by the police.

Sakal

Updated on

फुलंब्री : तालुक्यातील गेवराई पायगा (ता. फुलंब्री) येथील सरपंच मंगेश संजय साबळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ५६(१)(अ)(ब) अन्वये हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर, छत्रपती संभाजीनगर जिल्हा तसेच जालना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार का करण्यात येऊ नये, याबाबत सहायक पोलीस आयुक्त, शहर विभाग सागर देशमुख यांनी ८ ऑगस्ट २०२६ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com