
Gevrai Flood
Sakal
गेवराई : अतिवृष्टी आणि पुरपरिस्थितीने गेवराईतील जनजीवन विस्कळीत झाले होते.यात अनेकांचे पिक खरडुन गेले,घरात पाणी घुसले अशा आपतग्रस्तांशी महसुल व कृषी प्रशासनाने आपुलकीने वागत पंचनामे करताना अटी,शर्थी व निकषांच्या भानगडीत पडू नका अशा सुचना गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी आज शनिवारी आढावा बैठकीत दिल्या.