

Heated Clash Between Supporters on Voting Day in Gevrai
Sakal
बीड : गेवराई नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी शहरातील वातावरण प्रचंड तापले. बुथ क्र. 10 वर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे पुतणे पृथ्वीराज पंडित, तसेच भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांचा पुतण्या व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गीता पवार यांचा मुलगा शिवराज पवार यांच्यात किरकोळ वादातून शाब्दिक बाचाबाची झाली. काही क्षणात ही बाचाबाची धक्काबुककी आणि मारहाणीपर्यंत पोहोचली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने येत परिसरात काही काळ गोंधळ उडाला.