Gevrai Cylinder Blast Fire Accident News : गेवराईत दिवाळीत गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात चार जण गंभीर जखमी; चार घरे व दुचाकी जळून खाक, संजयनगर भागातील दुर्घटनेने सर्वत्र हळहळ

Fire Tragedy on Diwali Day : फटाक्यामुळे उडालेली आग पोहोचली स्वयंपाकघरापर्यंत; नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल, कृषी उत्पन्न बाजार समिती व नगरपालिकेच्या टॅन्करने आटोक्यात आणली आग
"Four seriously injured in severe gas cylinder blast in Gevrai."

"Four seriously injured in severe gas cylinder blast in Gevrai."

Sakal

Updated on: 

गेवराई : दिवाळीचा आनंद आणि उत्सवाचे वातावरण सुरू असतानाच, गेवराई शहरातील संजयनगर भागात एक अत्यंत भीषण आणि मनाला हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण चव्हाण यांच्या घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची टाकी अचानक स्फोट पावली. या दुर्घटनेत चार घरांना भीषण आग लागून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. सणासुदीच्या तोंडावरच घडलेल्या या आगीच्या तांडवात संसारोपयोगी वस्तू, अन्नधान्यासह एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्याने चव्हाण कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे.

Loading content, please wait...