घरातून बाहेर पडताना, सायलीने मी मरतीय, माझा शोध घेऊ नका अशी चिठ्ठी लिहून केली आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 November 2020

अभ्यासाचा ताण येत असल्याने, सोमवारी (ता. सोळा) रोजी पहाटे घरातून निघून गेलेल्या मुलीचा मृतदेह बुधवारी (ता. १८) रोजी सकाळी एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

गेवराई (जि.बीड) : अभ्यासाचा ताण येत असल्याने, सोमवारी (ता. सोळा) रोजी पहाटे घरातून निघून गेलेल्या मुलीचा मृतदेह बुधवारी (ता. १८) रोजी सकाळी एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदचे शिक्षक कल्याण पारेकर यांची मुलगी सायली कल्याण पारेकर (वय १७, रा.गणेश नगर), सोमवारी पहाटे घरातून निघून गेली होती. घरातून बाहेर पडताना, सायलीने मी मरतीय, माझा शोध घेऊ नका व कोणालाच जबाबदार धरू नका, अशी नोट लिहून ठेवली होती.

कोविड चाचणी नाही तर शिक्षकांना शाळेत 'एन्ट्री' नाही 

तिच्या वडलांनी मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांनी मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी पोलीस ठाण्यात सायली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीसांनीही तिचा शोध घेतला, मात्र उपयोग झाला नाही. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आले होते. बुधवार (ता. १८) पहाटे वाँक साठी जाणाऱ्या नागरीकांना तीचा मृतदेह शहरापासून जवळच असलेल्या गोविंदवाडी शिवारातील एका विहिरीत आढळून आला. सदरील, घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. उपनिरीक्षक युवराज टाकसाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Student Commits Suicide Due To Study Tension Beed News