जगण्याची इच्छा नसल्याने तरुणीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
आई-वडिलांवर माझे खूप प्रेम आहे; पण मी काय करू, जगण्याची इच्छा नसल्याने मी आत्महत्या करीत आहे. बहीण व भावाला जीव लावा, अशा आशयाची चिठ्ठी सापडली. तसेच पूजाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याचीही माहिती पी. एस. तायडे यांनी दिली.

औरंगाबाद - बारावीची परीक्षा दिलेल्या तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. दोन) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. तरुणीने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळली. त्यात जगण्याची इच्छा नसल्याचे तिने नमूद केले.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, पूजा संजय चाथे (वय १८, रा. गोकुळनगर, सुरेवाडी, हर्सूल परिसर) असे मृत मुलीचे नाव आहे. तिची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची आहे. वडील एका हॉटेलमध्ये कामाला असून आई कंपनीत कामावर जाते. मंगळवारी सकाळी आई-वडील कामाला गेले. त्यानंतर छोटी भावंडं शाळेत गेली. घरात एकटीच असल्याने तिने गळफास घेतला. दुपारी बारादरम्यान छोटा भाऊ शाळेतून घरी आला. त्यावेळी आत डोकावून पाहिल्यानंतर पूजा गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याला दिसली. हे पाहून तो घाबरला व त्याने हंबरडा फोडला.

पाठोपाठ वडील आले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. तसेच घराची पाहणी केली असता, पूजाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. ही चिठ्ठी जप्त करण्यात आली. या घटनेप्रकरणी हर्सूल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस हवालदार पी. एस. तायडे करीत आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
आई-वडिलांवर माझे खूप प्रेम आहे; पण मी काय करू, जगण्याची इच्छा नसल्याने मी आत्महत्या करीत आहे. बहीण व भावाला जीव लावा, अशा आशयाची चिठ्ठी सापडली. तसेच पूजाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसल्याचीही माहिती पी. एस. तायडे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Suicide Crime