उदगीर, (जि. लातुर) - शहरातील चर्चरोड परिसरात असलेल्या अल्पसंख्याक मुलींच्या वस्तीगृहामधील विद्युतीकरण साहित्याची अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. यात जवळपास सहा लाखाचे नुकसान झाले असुन या प्रकरणी अज्ञातावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.