विद्यापीठाला सर्वोत्तम करण्यासाठी उद्योजकांनी साथ द्यावी - डॉ. चोपडे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

औरंगाबाद - 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे अनेक संशोधनपर उपक्रम राबविले जातात. त्याच्या जोरावर विद्यापीठाला देशातील अव्वल विद्यापीठांच्या यादीत नेण्यासाठी उद्योजकांनी साथ द्यावी,'' असे आवाहन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दुसऱ्या "विद्यापीठ उद्योग संवाद' परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या पाच उद्योगपतींना "कॉर्पोरेट एक्‍सलन्स ऍवॉर्ड'ने गौरविण्यात आले.

औरंगाबाद - 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे अनेक संशोधनपर उपक्रम राबविले जातात. त्याच्या जोरावर विद्यापीठाला देशातील अव्वल विद्यापीठांच्या यादीत नेण्यासाठी उद्योजकांनी साथ द्यावी,'' असे आवाहन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दुसऱ्या "विद्यापीठ उद्योग संवाद' परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या पाच उद्योगपतींना "कॉर्पोरेट एक्‍सलन्स ऍवॉर्ड'ने गौरविण्यात आले.

विद्यापीठातील नाट्यगृहात मंगळवारी (ता.20) हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. चोपडे होते. या वेळी "बीसीयुडी'चे संचालक डॉ. सतीश पाटील, कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, परीक्षा नियंत्रक डॉ. डी. एम. नेटके, वित्त व लेखाधिकारी शंकर चव्हाण, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे, संयोजक डॉ. वाल्मीक सरवदे, उद्योजक एन. बी. कुलकर्णी, उद्योजक मुकुंद कुलकर्णी (संचालक, एक्‍सपर्ट सोलूशन्स), समन्वयक निवृत्ती गजभारे, डॉ. सूर्यभान सन्नासे, डॉ. अभिजित शेळके, डॉ. गिरीश काळे यांच्यासह नामवंत उद्योगपती उपस्थित होते. या वेळी डॉ. चोपडे म्हणाले, ""हे विद्यापीठ देशातील नव्हे, तर जगातील उत्तम विद्यापीठ बनविण्याचे आपले स्वप्न आहे. त्यासाठी उद्योजकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.'' सयोजक डॉ. वाल्मीक सरवदे यांनी प्रास्ताविकात विद्यापीठ संवाद समिट यामागची भूमिका स्पष्ट केली. "युुनिव्हर्सिटी इंडस्ट्रियल इंटरॅक्‍शन समिट' मध्ये पाच उद्योगपतींना "कॉर्पोरेट एक्‍लन्स ऍवॉर्ड'ने डॉ. चोपडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये रामचंद्र भोगले (अध्यक्ष, अप्लाईड इनोव्हेशन ऍण्ड टेक्‍नॉलॉजी), अनुराग जैन (व्यवस्थापकीय संचालक, एन्ड्युरनस), ऋषी बागला (अध्यक्ष, औरंगाबाद इलेक्‍ट्रिकल्स), श्रीकांत बडवे (व्यवस्थापकीय संचालक, बडवे ग्रुप), क्‍लॉज एन्ड्रेस (अध्यक्ष, एन्ड्रेस-हौजर, स्विर्झलॅंड) या पाच उद्योगपतींचा सन्मान करण्यात आला. एण्ड्रोसचे क्‍लॉज एन्ड्रेस यांच्या वतीने एन. श्रीराम आणि अनुराग जैन यांच्या वतीने रमेश गियानी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी सीएमआयएचे माजी अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी या उद्योगपतींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. डॉ. सुचिता यांबल यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्ती गजभारे यांनी आभार मानले. या परिषदेत उद्योजकांची उपस्थिती होती. सकाळच्या सत्रात उद्योजक उल्हास गवळी (बागला ग्रुप), प्रा. बी. एम. नाईक (शिक्षणतज्ज्ञ), एन. बी. कुलकर्णी (के. के. इंडस्ट्रीज), पी. बी. अंभोरे (बॅंक ऑफ महाराष्ट्र), डॉ. उन्मेष टाकळकर (सिग्मा हॉस्पिटल), निशिकांत तायडे यांनी मार्गदर्शन केले. "रोल ऑफ सीएसआर इन मेकिंग' या विषयावरील परिसंवादात त्यांनी सहभाग घेतला.

नंदकिशोर कागलीवाल यांच्या उपस्थितीत आज समारोप
नाथ ग्रुपचे प्रमुख नंदकिशोर कागलीवाल यांची प्रमुख उपस्थिती बुधवारी (ता.21) दुपारी अडीच वाजता होणाऱ्या समारोप कार्यक्रमास राहणार आहे. याआधी सकाळच्या सत्रात प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज ऍण्ड इंडस्ट्रियल रिक्वायरमेंटस या परिसंवादात प्रवीण देशमुख (संचालक, एमसीईडी), नतीन निजावंत (बजाज), अनुराग कल्याणी (सिमेन्स), निशिकांत तायडे, डॉ. संतोष भावे (भारत फोर्ब), डॉ. विजय पगारे, एस. एन. पठाण, राजेश जावळेकर हे सहभागी होतील. दुपारच्या सत्रात मेक इन इंडिया या विषयावरील परिसंवादात डॉ. सुधीर गव्हाणे (अध्यक्ष), राम मर्लापल्ले, तापस डे, अविनाश देसाई हे मार्गदर्शन करणार आहेत.
(सोबत फोटो जोडले आहेत.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To give the university with the best entrepreneurs