Godavari Flood: घरे गेली पाण्यात, अश्रू आले डोळ्यांत! महापुराने गोंदी परिसरातील गावांत शिरले पाणी, पिकेही बुडाली
Jayakwadi Dam : रौद्ररूप गोदावरी महापूरामुळे गोंदीसह परिसरातील शेकडो घरे पाण्यात बुडाली, शेतातील उभी पिकेही नुकसान पावल्या. ग्रामस्थ, पशुधनाचे स्थलांतर करून प्रशासनाने आश्रय व जेवणाची व्यवस्था केली.
गोंदी : रौद्ररूप धारण करीत वाहणाऱ्या गोदावरी नदीने सोमवारी (ता. २९) गोंदीसह परिसरातील गावात दाणादाण उडविली. महापुरात गावागावांत पाणी शिरून संसारोपयोगी साहित्यासह शेतातील उभी पिकेही पाण्यात बुडाली आहेत.