
Godavari Flood
sakal
गेवराई : सद्या सर्वत्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून नदी,नाले, ओढे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातून गोदावरी पात्रात मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना घराबाहेर पडणे मुस्कील झाले आहे.