Godavari Flood: जायकवाडी धरणातून गोदावरीत विसर्ग: गोंदी परिसरात सव्वादोन लाख क्युसेक पाण्याने गावांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले
Jayakwadi Dam Release: जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गोंदी परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. प्रशासन आणि ग्रामस्थांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.
गोंदी : जायकवाडी धरणातून गोदापात्रात सोडलेल्या पाण्याचा विसर्ग रविवारी (ता. २८) सव्वादोन लाख क्युसेकवर पोचल्याने रात्री गोंदी परिसरातील गावांत पाणी शिरले आहे.