Jyoti Shinde
sakal
चित्तेपिपंळगाव - छत्रपती तालुक्यातील गोलटगाव गटातून प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार ज्योती सुधाकर शिंदे यांनी दणदणीत विजय मिळवत इतिहास घडवला आहे. तर पंचायत समिती गोलटगाव गणातुन पुष्पा अंकुश साळुंके यांनी विजय मिळवला आहे. निवडणुकीत या विजयासोबतच प्रहार जनशक्ती पक्षाने पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत आपले खाते उघडले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या निकालाची मोठी चर्चा सुरू आहे.