esakal | दीड महिन्यात साडेपाच हजारांनी वाढले सोने!
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

वाटचाल चाळीस हजारांकडे, आयात कर वाढविल्याचा परिणाम 

दीड महिन्यात साडेपाच हजारांनी वाढले सोने!

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद - चीन-अमेरिका व्यापारी संघर्ष, फेडरल रिझर्व्हचे पतधोरण, तसेच जगभरात भारतासह अनेक देशांच्या केंद्रीय बॅंकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्यामुळे सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावर पोचले.

शनिवारी (ता. 24) 24 कॅरेट सोने प्रतितोळा 38 हजार 800 रुपयांनी विक्री झाले. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर दीड महिन्यात सोन्याचे दर तब्बल 5 हजार 300 रुपयांनी वाढले आहेत. दीड महिन्यात सोने 33 हजारहून 38 हजार 800 रुपयांवर गेले, तर चांदीने 40 हजारहून 45 हजार 200 रुपयांचा पल्ला गाठला. पावसाळ्यात सोने तुलनेने स्वस्त होते, असा अनुभव आहे; पण यंदा स्थिती तशी नाही. 
 
सरकारचे धोरण सराफाविरोधी 
'सबका साथ, सबका विकास' असे म्हणणाऱ्या मोदी सरकारकडून सोने-चांदी धोरणावर सातत्याने बदल केले जात आहेत. मागील तीन-चार वर्षांत जिल्ह्यातील सराफा व्यापार पूर्णतः मंदीच्या छायेत अडकला आहे. चीन आणि अमेरिकेचे व्यापारयुद्ध, देशात आलेली आर्थिक मंदी, त्यात जीवनावश्‍यक वस्तूंत झालेली वाढ यामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे. गेल्या दीड महिन्यापूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात कर दहा टक्‍क्‍यांवरून 12.5 टक्‍क्‍यांवर गेल्याने होती नव्हती सर्व कसर पूर्ण केली. दुसरीकडे मराठवाडा मागील वर्षापासून दुष्काळाचा सामना करत असल्याने जिल्ह्यासह मराठवाड्यातील सराफा बाजार 40 टक्‍क्‍यांनी घटल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. 
 

जगभरात केंद्रीय बॅंकांनी सोनेखरेदीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. एप्रिल ते जून 2019 या तिमाहीत जगभरात सोन्याची मागणी आठ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. दीड महिन्यात पाच ते साडेपाच हजार रुपयांनी भाव वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांना सोने खरेदी करणे अशक्‍य झाले. 
राजेंद्र मंडलिक, अध्यक्ष, सराफा व्यापारी असोसिएशन 
 

loading image
go to top