esakal | जालना शहरात सराफा व्यापाऱ्याला लूटले, एक लाख ८० हजारांचा मुद्देमाल लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

3crime_201_163

जालना शहरातील आझाद मैदान परिसरात एका सराफा व्यापाऱ्याला दोन दुचाकीवरील चौघांनी लुटल्याची घटना सोमवारी (ता.२८) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडले आहे.

जालना शहरात सराफा व्यापाऱ्याला लूटले, एक लाख ८० हजारांचा मुद्देमाल लंपास

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : जालना शहरातील आझाद मैदान परिसरात एका सराफा व्यापाऱ्याला दोन दुचाकीवरील चौघांनी लुटल्याची घटना सोमवारी (ता.२८) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडले आहे. घटनेत तब्बल एक लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरला आहे. जालना शहरातील सुवर्णकार नगर भागात राहणारे सराफा व्यापारी बालाप्रसाद अंबादास उदावंत यांची शहरातील बाजार चौकी परिसरात व्यंकटेश ज्वेलर्स दुकान आहे.

ते रोज रात्री दुकान बंद करताना सोने व चांदीचे दागिने घेऊन घरी जातात. नियमित सराफा व्यापारी बालाप्रसाद उदावंत हे सोमवारी रात्री सात वाजेच्या सुमारास आपले दुकान बंद करून हे दुचाकीवरून घरी निघाले होते. मात्र, रात्री साडेसात वाजेच्या शहरातील आझाद मैदान परिसरात त्यांच्या दुचाकीला अज्ञात दोन दुचाकीवरील चार जणांनी घेरले. या चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पावडर फेकली. तसेच काठीने मारहाण करत त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने व पैसे असलेली बॅग घेऊन हे दोन दुचाकीवरील चार जण पसार झाले.

बनावट धनादेशाद्वारे बॅंकेला तब्बल ३६ कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न

या बॅगमध्ये सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण एक लाख ८० हजार रुपयांचा ऐवज या चार चोरट्यांनी लंपास केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह सदर बाजार पोलिस ठाण्याचे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान या प्रकरणी बालाप्रसाद उदावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरट्यांनी रेकी करून या सराफा व्यापाऱ्यांला लुटल्याचा पोलिसांना संशय असून या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

संपादन - गणेश पिटेकर