मोफत साड्यांसाठी गेली, अन... पुढे असे घडले

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

0- आमिषापायी महिलेची दोन लाखाची फसवणुक
0- घरची मंडळी काय म्हणेल या भितीने कळविले नाही
0- चोरट्यांना हा नवा फंडा
0- रिकामाच रुमाल घेऊन महिला घरी

नांदेड : काकु, पुढे पैसे आणि मोफत साड्या वाटप सुरू असून तुम्हालाही साड्या मिळतील असे आमिष दाखविले. तुमच्या अंगावरील दागिणे काढून रुमालात बांधून ठेवा, असे म्हणून थोड्या अंतरावर त्या महिलेला नेऊन तिच्याजवळचे दोन लाख रुपये किंमतीचे दागिणे रुमालात बांधून देतो असे म्हणून तिची नजर चुकवून हे दागिणे लंपास केले. ही घटना श्रीगनर भागातशुक्रवारी (ता. २९) दुपारच्या सुमारास घडली.

 

चोरट्यांचा नवा फंडा

शहराच्या विवेकनगर भागात राहणाऱ्या प्रणिता विवेक शेटे (वय ६०) ह्या दुपारी श्रीनगर भागातील एका बँकेत त्या आल्या होत्या. बँकेचे काम करून त्या आपल्या घराकडे पायी जात होत्या. यावेळी तिच्या पाळतीवर असलेल्या अनोळखी दोन चोरट्यांनी त्यांना गाठले. काकु, पुढे पैसे व मोफत साड्या वाटप सुरू आहे. आताच खूप महिलांनी साड्या व पैसे घेऊन गेल्या. साडी म्हणताच प्रणिता शेटे यांनाही थोडा विश्‍वास बसला. कुठे आहेत म्हणून त्यांना या चोरट्यांनी काही अंतरावर नेले. परंतु तुम्ही श्रीमंत दिसत आहात. अंगावरील दागिण्यामुळे तुम्हाला साड्या व पैसे देणार नाहीत म्हणून तुम्ही अंगावरील दागिणे काढून रुमालात बांधून ठेवा. असे सांगितल्याने या चोरट्यांनी श्रीमती शेटे यांनी काढून घेतलेले दागिणे बंधून देतो असे म्हणून त्यांची नजर चुकवून फक्त रुमालाची गाठ बांधून त्यांच्या हातात ठेवली. दोन लाखाचे दागिणे परस्पर लंपास करून त्या ठिकाणाहून ते निघून गेले. 

रिकामाच रुमाल घेऊन महिला घरी

श्रीमती शेटे ह्या साडी व पैसे घेण्यासाठी पुढे गेल्या तर तिथे काहीच नाही. तोपर्यंत हे भामटे घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यांचा त्यांनी शोध घेतला मात्र ते सापडले नाही. शेवटी तशाच त्या आपल्या घरी निघून गेल्या. घरी गेल्यानंतर काही वेळाने त्यानी आपल्या हातातील रुमालाची गाठ सोडली. रुमालात दागिणे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना एकदम धक्का बसला. यांनी काही वेळ आपल्या घरी सांगितलेच नाही. त्यानंतर त्या नाराज दिसु लागल्या. लगेच त्यांच्या नातवाईकांनी त्यांची विचारपुस केल्यानंतर खरा प्रकार समोर आला. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांना सोबत घेऊन भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. प्रणिता विवेक शेटे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहेत.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gone for the free sarees, un ... this is what happened next