गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रकाश टाकणारे "द गुड, द बॅड ऍन्ड द अननोन'

जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांचे पुस्तक.
जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांचे पुस्तक.

उस्मानाबाद :  जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी आपल्या कारकिर्दीत गुन्ह्यांचा छडा लावताना आलेले अनुभव पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडले आहेत. "द गुड, द बॅड ऍन्ड द अननोन' या पुस्तकातून चांगल्या-वाईट अशा दोन्ही प्रवृत्तींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. उस्मानाबाद येथे जानेवारीमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

गुन्हेगारी जगतातील अनेक पैलू 
पोलिस विभागात महत्त्वाच्या पदावर काम करताना राजतिलक रौशन यांना चांगले-वाईट अनुभव आले. त्या अनुभवांचे कथन त्यांनी एका पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. या पुस्तकात त्यांनी गुन्हेगारी जगतातील अनेक पैलू उलगडले आहेत. एखाद्याची गुन्हेगारीची मानसिकता कशी तयार होते इथपासून तो सराईत गुन्हेगार कसा बनतो, या सर्व गोष्टींवर त्यांनी भाष्य केले आहे. समाजामध्ये वावरणारे सामान्य चेहरेसुद्धा कसे गुन्हेगार ठरतात, तसेच मानवी स्वभावाचाही गुन्ह्याशी किती जवळचा संबंध येतो, याची काही उदाहरणे त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये दिली आहेत. 324 पानांच्या या पुस्तकात अठरा वेगवेगळ्या कथा आहेत. सध्या हे पुस्तक ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध आहे; मात्र या पुस्तकाचे प्रकाशन दहा जानेवारी रोजी उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात करण्याचा मनोदय श्री. रौशन यांनी व्यक्‍त केला. 

समाजातील चांगल्या-वाईट प्रवृत्ती या पुस्तकातून दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. गुन्हेगारी मुळात कशी जन्माला येते. समाजमनावर त्याचा खोलवर किती परिणाम होतो, हे या पुस्तकामध्ये मांडले आहे. 
- राजतिलक रौशन, जिल्हा पोलिस अधीक्षक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com