esakal | Good News:हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार ३८२ जणांचे कोरोना लसीकरण

बोलून बातमी शोधा

जिल्हाधिकारी रुचेश जयलंशी
Good News:हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार ३८२ जणांचे कोरोना लसीकरण
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, महात्मा फुले जीवनदायी योजनेतील तीन खाजगी रुग्णालयात आतापर्यंत ३९ हजार ९६५ जणांना कोव्हीशिल्ड, तर १० हजार ३८२ जणांना कोव्हँक्सीन लस अशा ५० हजार ३८२ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, डॉ. शिवाजी पवार, डॉ. इनायतुल्ला, डॉ. गोपाल कदम, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. दिपक मोरे आदीच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात मागील काही दिवसापासून कोरोना लसीकरण केले जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन खासगी रुग्णालयात प्रत्येक दिवशी कोरोना लसीकरण सुरु आहे. ज्यामध्ये कोविशिल्ड ३९ हजार ९६५ तर कोव्हँक्सीन १० हजार ४१७ जणांना लस देण्यात आली.

हेही वाचा - शिवभोजन थाळीचा गोरगरीबांना आधार; दररोज अडीच हजार गरजुना लाभ

आतापर्यंत उपलब्ध झालेल्या कोविशिल्ड लसीकरणात हिंगोली जिल्हा रुग्णालयाच्या परिचारीका वसतीगृहात १,२५३, नर्सी नामदेव प्राथमिक आरोग्य केंद्रात ८२०, फाळेगाव १,११६, सिरसम प्राथमिक आरोग्य केंद्रात ७८९, भांडेगाव प्राथमिक आरोग्य केंशात २९२, कळमनुरी उपजिल्ला रुग्णालयात २,८२३, पोतरा प्राथमिक आरोग्य १, ६९६ वाकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात ५८२, नर्सी प्राथमिक आरोग्य केंद्रात ९८८, आखाडा बाळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात १३८७, डोंगरकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात १, ८७२ रामेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात ६६०, औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालय १, ८४३, शिरडशहापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात १, ००९, जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात १, १९६ , पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रात ९८८, लोहरा २,००५ , कुरुंदा १, १८१. हट्टा १, २७३, हयातनगर ५६०, टेंभुर्णी ७३७ पांगरा शिंदे ८४५, गिरगाव ३०४, सेनगाव ग्रामीण रुग्णालय १, ४५९ गोरेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १, ४०१, कवठा १, ६०२, साखरा ८६८, कापडसिंगी ७७३, स्नेहल नर्सिग होम हिंगोली १, ०४७, महात्मा ज्योतिबा आरोग्यदायी जीवन योजनेतील एकूण ३९ हजार ९६५ जणांना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे