esakal | शिवभोजन थाळीचा गोरगरीबांना आधार; दररोज अडीच हजार गरजुना लाभ

बोलून बातमी शोधा

शिवभोजन थाळी

शिवभोजन थाळीचा गोरगरीबांना आधार; दररोज अडीच हजार गरजुना लाभ

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लाॅकडाउन सुरु आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचा आकडाही त्याच गतीने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागला आहे. मात्र यात गोरगरिब लोकांसाठी शिवभोजन थाळई महत्वाची ठरत आहे. खऱ्या अर्थाने शिवभोजन थाळी खाल्ल्यानंतर गरजु व गरिब व्यक्ती तृप्त होऊन शासनाच्या या योजनेवर खुष होत आहेत. नांदेड शहराच्या गोकुळनगर रेल्वेस्थानक परिसरातील सरदार बुंगई यांचे शिवभोजन थाळी अनेकांसाठी आधार बनली आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे लाॅकडाऊनमध्ये गोरगरीब जनतेसाठी मोफत शिवभोजन योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ नांदेड शहरातील व जिल्ह्यातील गरजू व्यक्ती घेत आहेत. जिल्ह्यात एकूण 22 शिवभोजन केंद्र असून ज्याद्वारे जवळपास दोन हजार ५०० थाळीचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार रेल्वे स्टेशन गोकुळनगर येथील बुंगई हॉटेल अँड केटरिंग यांच्यातर्फे स्टेशन परिसर येथे 175 थाळी दररोज गरजू व्यक्तींना मोफत वितरण करण्यात येत आहे.

हेही वाचा - अवैधरित्या दारु व दोन महिलांसह पाच आरोपींविरुद्ध गुन्हा; जिंतूर पोलिसांची कारवाई

शिवभोजन थाळी एक महिन्याच्या कालावधीसाठी मोफत

शिवभोजन घेणाऱ्या नागरिक महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त करत आहत शिवभोजन मोफत भेटल्यामुळे आनंद व्यक्त करत आहेत. शासनाच्या या शिवभोजन थाळीचा सर्वसामान्य गरजू व्यक्तींना चांगलाच फायदा होत आहे. कोरोनाविषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर स्थलांतरित, बेघर तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने शिव भोजनाची थाळी ता. 15 एप्रिलपासून मोफत सुरु करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात ही मोफत थाळी अनेकांचा आधार बनली आहे अशी प्रतिक्रिया गरीब व गरजू लोकांमधून ऐकावयास मिळत आहे. जेवनाअभावी कुणाचेही हाल होउ नये व कोणी उपाशी पोटी झोपू नये यासाठी शिवभोजन थाळी एक महिन्याच्या कालावधीसाठी मोफत सुरु करण्यात आली अशून त्याचा लाभ अनेक गरजु व गरीब व्यक्ती घेत आहेत.