esakal | सुखद बातमी : खांबाळा येथे उपसंरपचासह सदस्यांनी स्वखर्चाने केला पाणीपुरवठा

बोलून बातमी शोधा

हिंगोली पाणी
सुखद बातमी : खांबाळा येथे उपसंरपचासह सदस्यांनी स्वखर्चाने केला पाणीपुरवठा
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : तालुक्यातील खांबाळा येथील उपसंरपचासह ग्रामपंचायत सदस्यांनी स्वखर्चाने शेतातून एक किलोमीटर जलवाहिनी टाकून गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण टाकीत पाणी उपलब्ध करुन दिल्याने गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सुटल्याने गावकरी समाधानी झाले आहेत.

हिंगोली तालुक्यातील खांबाळा येथे मागच्या काही दिवसांपासून पाणी पातळी खोलवर गेल्याने पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे गावकऱ्यांची भटकंती होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी उपसरपंच दतराव पवार, सदस्य गजानन पवार, मारोतराव काळे, केशव शाकट यांनी पुढाकार घेत दतराव पवार यांच्या शेतातून एक किलोमीटर जलवाहिनी टाकली. यासाठी लागलेला खर्च उपसरपंच व चार ग्रामपंचायत सदस्यांनी उचलला व गावात पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण टाकीत पाणी उपलब्ध केले आहे.

हेही वाचा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील ऑक्सीजन प्लॅन्टचा पाईप फुटल्याची घटना मंगळवारी (ता. 27) रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

त्यामुळे गावातील पाण्याचा प्रश्न मिटल्याने गावकरी समाधानी झाले आहेत. यासाठी गजानन पवार उपसरपंच ‌दत्तराव पवार, मारोतराव काळे, माजी सरपंच केशव शाकट, माजी सरपंच रामप्रसाद काळे तसेच विश्वनाथ काळे, जगन पवार, गंगाराम पवार, किसन काळे, चेअरमन पंडित पवार, प्रभुजी पवार, बळीराम पवार, सोनाजी गवळी, उत्तम पवार, विनोद पवार, अंकुश पवार, बद्रीनाथ पवार, सारंगधर काळे, गोविंद पवार, भागवत काळे, मधुकर काळे, हनवता पवार, मारुती पवार, हनुमान काळे, संदीप काळे, डॉ. भारत काळे आदींनी पुढाकार घेतला.

संपादन- प्रल्हाद कांबळे