बांधकाम मंत्री अशोक चव्हाणाकडून विद्यार्थ्यांसाठी ही खुश खबर

Nanded Photo
Nanded Photo


नांदेड :  ज्येष्ठ नेते (कै) शंकरराव चव्हाण यांना जेव्हा जेव्हा देशाची सेवा करण्याची संधी मिळाली, तेव्हा तेव्हा त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या वर्षीपासून ‘जलदिन’ साजरा करण्यात येत आहे. शंकरराव चव्हाण यांची कर्मभूमी असणाऱ्या नांदेड शहरासाठी विविध विकास योजना राबविल्या जाणार असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात लवकरच त्यांच्या नावाने स्पर्धा परीक्षा केंद्र संकुल, वसतिगृह उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

ज्येष्ठ नेते डॉ. शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या पुण्यस्मरणानिमित्त यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात बुधवारी (ता. २६) सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या संगीत शंकर दरबारचे उद्‍घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी श्री. चव्हाण बोलत होते. या वेळी श्री. चव्हाण यांच्या हस्ते परभणी येथील ज्येष्ठ गायिका कलावंत श्रीमती नलिनी देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी आमदार अमर राजूरकर, मोहन हंबर्डे, माधव पाटील जवळगावकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार वसंत चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दीक्षा धबाले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, नरेंद्र चव्हाण यांच्यासह चव्हाण कुटुंबीयांची उपस्थिती होती.

मराठवाडा विद्यापीठ परिसरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र​

‘शंकरराव चव्हाण यांना सुरवातीपासूनच संगीताची आवड होती. विशेष करून ते शास्त्रीय संगीताचा मनापासून आनंद घेत. आई - वडिलांच्या स्मरणार्थ गेल्या १६ वर्षांपासून संगीत शकर दरबार कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. हा महोत्सव संगीत रसिकांच्या प्रेमाचे प्रतिक बणला असून याची नोंद देशपातळीवर घेतली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून शंकरराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून यूपीएसी, एमपीएसी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सर्व त्या सुविधा देण्यात येतील. 

मुंबईच्या सेंटर भवन येथे ता. ११ मार्चला कार्यक्रम​

शंकरराव चव्हाण यांचे सहकारी राहिलेले (कै.) राजाराम बापू पाटील, रफिक झकेरिया यांच्यासह अनेकांचे स्मरण म्हणून मुंबईच्या सेंटर भवन येथे ता. ११ मार्चला कार्यक्रम घेण्यात येणार असून या कार्यक्रमास नांदेडकरांना आमंत्रण देत असल्याचे ते म्हणाले. या वेळी पुरस्कारास उत्तर देताना नलिनी देशपांडे म्हणाल्या की, ‘‘गुरुवर्य पंडित अण्णासाहेब गुंजकर यांचा हा बहुमूल्य ठेवा आहे.’’ प्रा. विश्वाधार देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com