Good News : हिंगोलीत कोरोनामुक्त रुग्णांना वृक्ष भेट, या रुग्णालयाचा आदर्श उपक्रम

हिंगोली येथील एका रुग्णालयामध्ये कोरोना बाधित अति गंभीर रुग्णांवर माफक दरात यशस्वी उपचार केले जात आहेत.
वृक्ष भेट
वृक्ष भेट

हिंगोली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona virus wave) राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सीजन तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी माणसाला ऑक्सीजनची (Oxygen) किती गरज आहे हे समोर आले. म्हणूनच कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांना वृक्ष भेट (Tree gift) देऊन संगोपन करण्याचा संदेश हिंगोली येथील एका रुग्णालयाच्या वतीने देण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे कोरोनातील अति गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात देखील डॉ. जाहीर पठाण यांना यश आले आहे. (Good News: Tree gift to corona free patients in Hingoli, an ideal project of this hospital)

हिंगोली येथील एका रुग्णालयामध्ये कोरोना बाधित अति गंभीर रुग्णांवर माफक दरात यशस्वी उपचार केले जात आहेत. हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. जाहीरखा पठाण यांनी सांगितले की, ज्या रुग्णाचा स्कोअर १५ पेक्षा अधिक होता अशा जवळपास १५० रुग्णांवर आम्ही यशस्वी उपचार करु शकलो याचे समाधान वाटत आहे. नांदेड, हैद्राबाद अशा ठिकाणी जाऊन लाखो रुपये खर्च करून मिळणारे उपचार आता माफक दरात हिंगोली येथे उपलब्ध आहेत. शिवाय आयकॉन हॉस्पिटल येथे नुकतीच महात्मा फुले जन आरोग्य योजना अंर्तगत देखील उपचार करण्यास सुरवात झाल्याने गोर गरीब रुग्णांना याचा फायदा होणार आहे.

हेही वाचा - हिंगोली जिल्‍ह्यात ६८२ कामावर नऊ हजार मजुरांच्या हाताला काम

येथे होणाऱ्या यशस्वी उपचारामुळे वसमत, नांदेड, वाशिम, अकोला, उमरखेड आदी भागातील रुग्ण उपचाराकरीता दाखल होत आहेत. यासाठी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. जाहीर खान पठाण यांच्यासह डॉ. मुद्दस्सीर खा, डॉ. फैसल व कर्मचारी पुढाकार घेत आहेत. परिणामी या ठिकाणी उपचार घेण्यासाठी अनेक ठिकावरुन रुग्ण दाखल होत आहेत. उपचारा दरम्यान रुग्णांना ऑक्सीजनची मोठ्या प्रमानात गरज पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन रुग्णांनी आपल्या आयुष्यात किमान एक झाड तरी जगवावे हा संदेश देण्या करीता आम्ही रुग्ण बरे झाल्यावर त्यांना पिंपळ झाड भेट म्हणून देत आहोत. नागरिकांनी देखील जास्तीत जास्त झाडे लावावी व संगोपन करावे. तसेच नेहमी मास्क आणि सँनिटायझर चा वापर करावा असे आवाहन डॉ. जाहीर पठाण यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com