esakal | प्रभाग क्रमांक एकसह चौदामध्ये लसीकरणाला चांगला प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

marathwada

प्रभाग क्रमांक एकसह चौदामध्ये लसीकरणाला चांगला प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : महानगर (Municipal) पालीकेच्यावतीने शहरात लसीकरण मोहीम सुरू असून रविवारी (ता. १०) शहरातील प्रभाग क्रमांक १ व १४ मधील लसीकरण केंद्रास स्थानिक नगरसेवकांसह अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी भेट देली.

शहरात महापालीकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीमेला वेग देण्यात आला आहे. त्यासाठी रविवारी देखील लसीकरण सुरू ठेवण्यात आले आहे. १६ प्रभागात १६ पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबत नगरसेवकांना देखील मोहीमत जनजागृतीसाठी आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार रविवारी (ता.१०) प्रभाग एक मध्ये बेलेश्वर नर्सिंग कॉलेज नांदखेडा रोड दिवसभरात एकूण लसीकरण १०० पहिला डोस, २६ पुरुष ३२ महिला, दुसरा डोस ११ पुरुष ३२ महिला असे लसीकरण झाले आहे.

हेही वाचा: पुण्यात येत्या सोमवारपासून कॉलेज सुरू होणार; निर्बंध शिथिल

नगरसेवक गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी रविवारी लसीकरण केंद्रास भेट दिली. प्रभाग क्रमांक ९ मध्ये उपमहापौर भगवान वाघमारे, नगरसेवक प्रतिनिधी अमोल जाधव यांनी लसीकरण केंद्रास भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. प्रभाग १४ मध्ये लसीकरण केंद्रास नगरसेवक अखिल काजी, मो. अहमद यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी नागरीकांशी संवाद साधला. या ठिकाणी १५१ जणांचे लसीकरण करण्यात आले.

loading image
go to top