esakal | पुण्यात येत्या सोमवारपासून कॉलेज सुरू होणार; निर्बंध शिथिल
sakal

बोलून बातमी शोधा

college

पुण्यात येत्या सोमवारपासून कॉलेज सुरू होणार; निर्बंध शिथिल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यातील कोरोना संसर्ग पुर्णपणे नियंत्रणात आला आहे. यामुळे याबाबत लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याची घोषणा पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.८) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना केली. यामुळे शहर व जिल्ह्यातील शाळांपाठोपाठ आता सर्व वरिष्ठ महाविद्यालययेही येत्या सोमवारपासून (ता.११) सुरू करण्याचा आदेश दिला असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: पुण्यात पर्यटनस्थळं, नाट्यगृहं सुरू होणार

मागील सुमारे दीड वर्षांपासून बंद असलेली पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील वरिष्ठ महाविद्यालयांची दारे आता उघडली जाणार आहेत. मात्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय पुणे जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असणार आहे.

पुणे जिल्ह्यातील कोरोना लसीकरण १ कोटी नऊ लाखांहून अधिक झाले आहे. तसेच शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये लसीकरण वाढविले जाणार आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू दर कमी झाला आहे. यामुळे हे निर्बंध शिथिल करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पवार यांनी शुक्रवारी शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.

हेही वाचा: विरोधकांच्या नातेवाईकांवर छापे टाकणे हा अतिरेक : छगन भुजबळ

निर्बंध शिथिल झाल्याने....

  • खासगी कार्यालये शंभर टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू होणार

  • हॉटेल रात्री अकरा वाजेपर्यंतपर्यंत सुरू ठेवता येणार

  • येत्या २२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे आणि नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरू होणार

  • केंद्र आणि राज्य सरकारशी संबंधित सर्व प्रशिक्षण सुरू करण्यास मुभा

loading image
go to top