

gopichand padalkar
esakal
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आक्षेपार्ह विधान प्रकरणी छावणी पोलिसांना न्यायालयात लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सांगली शहरातील रामनगर चौकात १७ जून २०२५ रोजी आमदार पडळकर यांची सभा झाली. या सभेतील भाषणात त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंविषयी प्रक्षोभक विधान केले होते. ख्रिस्ती समाजाविरुद्ध आक्षेपार्ह उल्लेख करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन द्वेषमूलक भावनेला प्रोत्साहन मिळाले, असा दावा करण्यात आला आहे.