
परळी वैजनाथ : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी (ता. तीन) विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गोपीनाथ गडावर जय्यत तयारी सुरू आहे. राज्यभरातील मुंडेप्रेमी गोपीनाथ गड येथे अभिवादनासाठी दाखल होणार आहेत.