gor banjara community reservation demand
sakal
कन्नड - हैद्राबाद गॅझेटीयरनुसार महाराष्ट्रातील गोर बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एस. टी.) प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी कन्नड तालुक्यातील सकल गोर बंजारा समाजाच्या वतीने सोमवारी (ता. १९) भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात हजारोंच्या संख्येने गोर बंजारा समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.