
Walmik Karad: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा राईट हँड म्हणून ओळखला जाणारा गोट्या गित्ते मकोकातून बाहेर आला आहे. ज्याची दहशत महाराष्ट्राने पाहिली, ज्याच्यावर अनेक गुन्ह्यांचे आरोप आहेत त्याला पोलिसांनी मकोकातून बाहेर काढल्याने संताप व्यक्त होतोय. बीडचे बाळा बांगर यांनी गोट्या गित्तेला समाजसेवक म्हणून घोषित करा, अशी उपहासात्मक मागणी केली आहे.