Matoshri Scam : मातोश्री महिला पतसंस्थेच्या ठेवीदार फसवणूक प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीला गृह विभागाची मंजुरी मिळाली आहे. जप्त मालमत्ता विकून ठेवीदारांना परतावा दिला जाणार आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली.
बीड : मातोश्री महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपींच्या स्थावर मालमत्तांच्या जप्तीला गृह विभागाने मंजुरी दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ‘एमपीआयडी’चा प्रस्ताव शासनाला पाठविला होता.