जेष्ठांच्या प्रश्‍नांकडे लक्ष घालण्यास सरकारला वेळ नाही 

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 9 जुलै 2018

नांदेड - सध्या पावसाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून, या अधिवेशनात जेष्ठांच्या प्रश्नांकडे सरकारला लक्ष घालण्यास वेळ मिळत नसल्याचा आरोप येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ तथा सहयोग जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी ‘सकाळ'कडे बोलतांना केला. 

नांदेड - सध्या पावसाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून, या अधिवेशनात जेष्ठांच्या प्रश्नांकडे सरकारला लक्ष घालण्यास वेळ मिळत नसल्याचा आरोप येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ तथा सहयोग जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी ‘सकाळ'कडे बोलतांना केला. 

राज्यात जेष्टांची संख्या फार मोठी आहे. परंतु, हे जेष्ठ वयांची साठ वर्ष ओलांडली की, परावलंबी होतात. त्यांना अनेक आजाराने ग्रासले जाते. नोकरीनिमित्त पाल्य व अन्य नातेवाईक बाहेरगावी असतात. त्यामुळे या जेष्ठांना ज्या वयात मानसिक व आपल्या माणसांचा आधार लागतो त्यावेळीच ते निराधार होत आहेत. परंतु या जेष्ठांचे प्रश्‍न घेऊन मागील पाच वर्षापासून शासनदरबारी न्याय मिळावा म्हणून येथील डॉ. हंसराज वैद्य हे प्रयत्न करीत आहेत. 

काय आहेत मागण्या..?
- जेष्ठांची वयोमर्यादा ६५ वर्षाऐवजी केंद्रशासनाप्रमाणे ६० वर्ष करावी
- सर्व जेष्ठ नागरिकांना उत्पन्नाची मर्यादा न ठेवता प्रतीमहा किमान साडेतीन हजार रुपये मानधन सुरू करावे
- जेष्ठ नागरिकांसाठी दारिद्र्य रेषेखाली नाव असणे बंधनकारक असु नये 
- राजीव गांधी आरोग्यदायी योजनेत उत्पन्नाची अट न ठेवता सर्वच जेष्ठ नागरिकांचा समावेश करावा
- सर्व जेष्ठांना आरोग्य विमान योजना शासनाने चालु करावी
- एक ऑक्टोबर २०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या धोरणांचा आदेश पारीत करुन प्रभावी अंमलबजावणी करावी यासह आदी मागण्याचा विचार सरकारने करावा असे डॉ. हंसराज वैद्य यांनी केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government does not have time to look into the problems of the senior citizens