सरकारी कर्मचाऱ्यांची होणार चंगळ : कशी ते वाचायलाच पाहिजे

File photo
File photo
Updated on

नांदेड : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने पाच दिवसाचा आठवडा जाहीर केल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या सुट्यात भरमसाट वाढ झाली असून, २०२० मध्ये आता उरलेल्या ३०७ दिवसामध्ये १०२ सुट्या मिळणार असल्याने त्यांची चांगलीच चंगळ होणार आहे.

कर्मचाऱ्यांचा जागा दिसणार रिक्त
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर झालेल्या निर्णयानुसार अतिरिक्त शनिवारच्या एकूण ४४ सुट्या त्यांना अधिक मिळत आहेत. त्यात या कर्मचाऱ्यांना सलग सुट्या घेण्याची संधी आता उर्वरीत सात महिन्यात ११ वेळा मिळणार आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयात बहुतांश वेळा कर्मचाऱ्यांच्या जागा वर्षभरात शेकड्याहून अधिक दिवस रिक्त दिसणार आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयात या कर्मचाऱ्यांना ४५ मिनीटांचे अतिरिक्त काम दिले असले तरी या वर्षातील उरलेल्या कार्यालयीन कामकाजाच्या २०५ दिवसात ते केवळ नऊ हजार २२५ मिनीटे अधिक होते. मात्र ते वाढलेल्या सुट्यांच्या तुलनेत अतिशय नगण्य आहे.

अशा आहेत सुट्या
सलग सुट्याचे चित्र सरकारी कार्यालयात मार्च, एप्रिल, मे, आॅक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दिसणार आहे. या महिन्यात कर्मचारी शनिवारला लागून सुट्या आल्याने सलग तीन अथवा चार दिवस कार्यालयात दिसणार नाहीत. सात आणि आठ मार्चच्या शनिवार-रविवारच्या सुट्यांना लागून नऊ तारखेची रजा टाकली की १० मार्चला धुलीवंदनाची सुटी आहे. त्यामुळे त्यांना सलग चार दिवस सुटी घेता येणार आहे. काही कर्मचारी गुढी पाडवा साजरा करण्यासाठी २१, २२ मार्चला जोडून २३, २४ची रजा टाकून गुढी पाडव्यापर्यंत सुटीवर राहतील.

सुट्यांना जोडून रजेवर जाण्याची संधी
दोन ते सहा एप्रिल रामनवमी ते महावीर जयंती असे चार दिवस, १० एप्रिल ते १४ एप्रिल म्हणजे गुड फ्रायडे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असे चार दिवस सुटी घेऊ शकतात. मे महिन्यात या कर्मचाऱ्यांना एक ते तीन मे आणि २३ ते २५ मे असे दोन वेळा तीन दिवस रजा घेण्याची संधी आहे. आॅक्टोबर महिन्यात ३० तारखेला ईद शुक्रवारी असल्याने सलग तीन दिवस, नोव्हेंबर महिना हा दिवाळी सणाचा महिना असल्याने १४ ते १६ आणि २८ ते ३० अशी सलग सुट्यांची संधी आहे. वर्षअखेरीस नाताळ हा सण देखील शुक्रवारी येत असल्याने २५ ते २७ किंवा त्यापेक्षा अधिक काळ रजेवर जाण्याची संधी हे कर्मचारी साधू शकतात.

हे देखील बघितलेच पाहिजे - VIDEO : सासऱ्याने पुरविला सुनेचा हट्ट : घरावर उभारला अश्वारुढ पुतळा

अशा असतील सुट्या

मार्च - ११ दिवस
एप्रिल - १२ दिवस
मे - १३ दिवस
जून - ८ दिवस
जुलै - ८ दिवस
आॅगस्ट- ११ दिवस
सप्टेंबर - ८ दिवस
आॅक्टोबर - ११ दिवस
नोव्हेंबर - ११ दिवस
डिसेंबर - ९ दिवस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com