File photo
File photo

वाचा : ‘ती’ चुटकीसरशी हरवली अन् कुणाला सापडली

नांदेड : माणसाच्या मनावरील तणाव व दुःख निर्माण करण्यास माणूस बऱ्याच वेळा स्वतःच कारणीभूत ठरतो. शाश्‍वत नात्यांना लाथाडून अनेक वेळा मोबाईल, फेसबुकवरून निर्माण झालेल्या तकलादू नात्यांच्या मागे लागतो. एकमेकांच्या मनातील दुःख, आनंद व्यक्त करण्यासाठी अशी कृत्रिम नाती उपयोगाची नसतात.

हेही वाचा - लाखमोलाचा साप, त्याच्या मागे लागली टोळी
 
माणूस जन्माला येतो तो अनेक नाती आणि ऋणानुबंध सोबत घेऊन.  आपल्यालाला लाभलेले आई-वडील, बहिण, भाऊ, काका, मामा, आत्या, मावशी हे आपले विस्तारीत कुटुंब असते. या प्रत्येकाचे काही ऋणानुबंध असतात आणि त्याचे सहकार्य आपल्या आयुष्याला लाभलेले असते. पण ही नाती सहज मिळतात म्हणून आपल्याला अनेकदा त्यांची किंमत नसते. या नात्यांची किंमत अनाथाश्रमात एकाकी वाढणाऱ्या मुलांकडे पाहून कळते. त्यांच्या डोळ्यात मायेच्या एका स्पर्शासाठी आसुसलेली व्यथा दिसली की लक्षात येतं. 

कृतज्ञतेची भावना असावी
सकाळी उठल्याबरोबर पायावर डोकं ठेवण्यासाठी आई-वडिल सोबत असणं किती भाग्याचं असतं ! भांडायला, खेळायला, लाड करायला मामा, काकी, मावशी, आत्या असणं आणि त्यंची जाणीवपूर्वक कृतज्ञता बाळगणं किती महत्त्वाचं असतं हेही या अनाथ मुलांकडे पाहून आपोआप कळतं. या सर्व नात्यांबद्दल मनात कृतज्ञतेची भावना असली की, आपल्याही आयुष्याला, जगण्याला वेगळा अर्थ प्राप्त होत असतो. आनंद मिळत असतो. तणाव नाहीसा होतो.

‘आधार’च वृद्धाश्रमाच्या आश्रयाला
माणसाच्या मनावरील तणाव व दुःख निर्माण करण्यास माणूस बऱ्याच वेळा स्वतःच कारणीभूत ठरत असतो. शाश्‍वत नात्यांना लाथाडून अनेक वेळा मोबाईल, फेसबुकवरून निर्माण झालेल्या तकलादू नात्यांच्या मागे लागतो. एकमेकाच्या मनातील दुःख, आनंद व्यक्त करण्यासाठी अशी कृत्रिम नाती उपयोगाची नसतात. अशा मैत्रीतून एकत्र येणे, खाणे-पिणे म्हणजे तो सुखाचा निव्वळ आभास असतो. मनातलं दुःख किंवा आनंद व्यक्त करायला घरातीलनात्यांचा आधार महत्त्वाचा असतो. पण हे आधार अलीकडे वृद्धाश्रमांच्या आश्रयाला निघून जात आहेत.   

आनंद पाहिजे की तणाव पाहिजे?
चेहऱ्यांवर कृत्रिम हास्य असले तरी मनात एकप्रकारची अनामिक भीती आहे. हसणे आणि रडणे या दोन्हीही निसर्गदत्त क्रिया माणूस विसरत चालला आहे. मनातल्या मनात दुःख कोंडल्याने, भावनांचा निचरा करणाऱ्या जागाच गमावून बसल्याने माणूस तणावग्रस्त आयुष्य जगत आहे. म्हणून आई, वडील, भाऊ, बहिणी, आत्या, मावशी  सगळी शाश्‍वत नाती जगण्यातील तणाव नाहीसा करतील. त्यांना सांभाळले तर त्यांचे पाठीवरून फिरणारे हात जगण्याला नवे बळ देतील आणि या सर्वांसाठी तुमच्या मनात निर्माण झालेली कृतज्ञतेची भावना हीच आयुष्याचा खरा आधार ठरेल. पण शेवटी यापैकी नेमके काय स्वीकारायचे? आनंद की तणाव हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे.

स्वतःपुरता विचार करू नका
राहायला घर असणं, घरात सुखसोयी असणं, मनासारखे शिक्षण घेता येणं, चवीनं रोज खायला मिळणं, अर्थार्जनाची काहीतरी सोय असणं, मुलं-बाळं व्यवस्थित, धडधाकट असणं, याबद्दल मनात समाधान असायला हवे. कारण यापैकी एकही गोष्ट न मिळताही आनंदाने जगणारे आदिवासी पाड्यातील वनवासी पाहिले की, आपल्या पदरात किती सुख आणि आनंद भरभरून आहे ते कळतं. म्हणून माणसाने आयुष्याच्या स्वतःपुरता विचार केला तर वाट्याला चिडचिड आणि तणाव यापलीकडे काहीच येत नाही. 
- डॉ. सदानंद भाटेवाड (समुपदेशक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com