Latur : स्वघोषणापत्रावर तृतीयपंथींना सरकारी ओळख

मतदार नोंदणी; विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे नियोजन
latur
latursakal

लातूर : तृतीयपंथींना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्नांची पराकाष्ठा होत आहे. त्याची पहिली पायरी म्हणून त्यांना मतदार म्हणून सरकार दरबारी ओळख देण्याचा उपक्रम भारत निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. यातूनच कोणतेही कागदपत्र न घेत केवळ स्वघोषणापत्रावर तृतीयपंथींची मतदार म्हणून नोंदणी करण्याची सवलत आयोगाने दिली आहे. त्या पर्यायाचा अवलंब करून उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे - विरोळे यांनी मतदार नोंदणीसाठी तृतीयपंथीमध्ये आत्मविश्वास जागवला. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि अंतिम यादी प्रसिद्धीपूर्वीच्या शेवटच्या दिवशी गुरूवारी (ता. चार) दहा तृतीयपंथींनी मतदार म्हणून नोंदणी केली.

मतदार नोंदणीमुळे तृतीयपंथींना निवडणूक ओळखपत्र मिळणार असून त्याआधारे त्यांना आधार नोंदणीसह शिधापत्रिका, घरकुल व अन्य सरकारी योजनांचा लाभ घेणे सुकर होणार आहे. केवळ मतदार नोंदणीवरच न थांबता तृतीयपंथींना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती नऱ्हे यांनी दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीला चालना देण्यात येत असून यात विशेष शिबिरांचेही आयोजन केले जात आहे. या स्थितीत तुलनेने तृतीयपंथींची मतदार म्हणून नोंदणी कमी होती.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी ही बाब मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यानुसार उपविभागीय अधिकारी व शहर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी नऱ्हे यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) सूचना देत नियोजन केले.

बीएलओंनी तृतीयपंथींची विश्वास संपादन करत त्यांना मतदार नोंदणीचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर नऱ्हे यांनीही त्यांचे समुपदेशन केले. त्यानंतर तहसील कार्यालयात गुरूवारी आयोजित विशेष शिबिरात दहा तृतीयपंथींनी पुढे येत मतदार नोंदणी केली. या वेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियंका अयारे, तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसीलदार भिमाशंकर बेरुळे, बीएलओ शंकर जाधव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तृतीयपंथी समाजघटकांकडे रहिवासी व जन्मनोंदणीच्या पुरावे नाहीत. यामुळे आयोगाने स्वघोषणापत्रावरच त्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्याची सवलत दिली. यामुळे तृतीयपंथींना ओळख मिळण्यासह मतदानाचा हक्क व सरकारी योजनांची लाभ मिळणे सोयीचे झाले आहे.

- रोहिणी नऱ्हे - विरोळे, उपविभागीय अधिकारी, लातूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com