गव्हाऐवजी मका खा ! शासनाकडून रेशनकार्डधारकांची थट्टा

उमेश वाघमारे
Sunday, 13 September 2020

राज्यातील अनेक गोरगरिब आजही रेशन दुकानावरील गहू आणि तांदूळावर आपल्या कुंटुबाचे पोट भरतात. त्यात कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊननंतर तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाल्याने रेशन दुकानाचा गहू आणि तांदूळाचा अनेक गोरगरिबांना पोटाची खळगी भरण्यासाठी मोठा आधर मिळाला. मात्र, शासनाने राज्यातील गरिबांची थट्टा मांडल्याचे चित्र आहे.

जालना : राज्यातील अनेक गोरगरिब आजही रेशन दुकानावरील गहू आणि तांदूळावर आपल्या कुंटुबाचे पोट भरतात. त्यात कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊननंतर तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाल्याने रेशन दुकानाचा गहू आणि तांदूळाचा अनेक गोरगरिबांना पोटाची खळगी भरण्यासाठी मोठा आधर मिळाला. मात्र, शासनाने राज्यातील गरिबांची थट्टा मांडल्याचे चित्र आहे. कारण जिल्ह्यासह राज्यातील रेशन दुकानावर आता गव्हाऐवजी मका दिली जात आहे.

विशेष म्हणजे पुढील दोन महिने गव्हू न देता रेशनकार्डधारकांना मका पुरविली जाणार असल्याचे जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे शासन आता गव्हाऐवजी मका भरडून खाण्याचा अप्रत्यक्ष सल्ला देत गरिबांची थट्टा उडवित असल्याचे चित्र आहे. राज्यातील रेशनकार्डधारकांना शासनाकडून अल्पदरामध्ये रेशन दुकानांच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ दिला जातो.

पोलिस कर्मचाऱ्याचा निरोप समारंभ ठरला शेवटचा, कार दुभाजकावर आदळून नदीत कोसळली

त्यामुळे अनेक गरिबांच्या कुंटुबांचे पोट या गव्हासह तांदूळावर भरते. परंतु, शासनाने यंदा नाफेडच्या खरेदी केंद्राच्या माध्यमातून तूर, उदीड, मुग आणि मका खरेदी केली आहे. त्यामुळे शासनाने खरेदी केलेल्या मकाचे काय करायचे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने खरेदी केलेली ही मका आता रेशनकार्डधारक गरीबांच्या मुळावर उठली आहे.

कारण प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत शासनाकडून रेशन दुकानांच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन महिन्यांमध्ये गव्हाऐवजी मका दिली जात आहे. शासनाकडून प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजना व अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत रेशनकार्डधारकांना प्रति लाभार्थी तीन किलो गव्हू दिले जातो. मात्र, आता गहू न देता प्रति लाभार्थी तीन किलो मका एक रुपये किलोप्रमाणे दिली जात आहे. परिणामी गोरगरिब रेशनकार्डधारकांना मका खाऊ घालण्याचा घाट शासनाने मांडले आहे, यात शंका नाही.

खासदार, आमदारांच्या घरासमोर आता आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक पवित्र्यात  

गव्हाच्या चपात्या, मकाचं काय ?
रेशन दुकानांद्वारे शासनाकडून मिळणाऱ्या गव्हाच्या चपात्या करून पोटाची खळगी भरली जात होती. मात्र, शासनाने रेशनकार्डधारकांच्या तोंडाचा गव्हाचा घास हिरावून रेशन दुकानांमार्फत मका हवाली केली जात आहे. त्यामुळे आता मकाच भरडून खावी का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

राज्य शासनाने ज्या जिल्ह्यात शेतकऱ्यांची मका खरेदी केली आहे. त्या जिल्ह्यात रेशन दुकानांमार्फत पुढील दोन महिने गव्हाऐवजी मका पुरवठा करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रेशन दुकानांद्वारे प्रतिकिलो एक रुपये प्रमाणे प्रतिलाभार्थी तीन किलो मका वितरण केले जात आहे. तसेच दुसऱ्या येजनेअंतर्गत गहू ही रेशनकार्डधारकांना पुरविला जात आहे.
- रिया बसय्यै, जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Government Not Provide Wheat To Ration Cardholders Jalna News