
फुलंब्री : शासनाच्या माध्यमातून कुठलीही शासकीय योजना राबवायची म्हटलं तर अधिकाऱ्यांची मनस्थिती चांगली पाहिजे. लाभार्थ्यांची कामे करण्याची मानसिकता शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी ठेवावी. त्याचवेळेस संबंधित योजना तळागाळापर्यंत पोहोचून खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. फुलंब्री तालुक्यातील आदर्श गाव किनगाव येथे एक दिवस गावकऱ्यासोबत हा उपक्रम शुक्रवारी (ता.२८) राबविण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.