esakal | परभणीच्या मेडीकल कॉलेजसाठी सरकार सकारात्मक...! परंतू होत का नाही ?
sakal

बोलून बातमी शोधा

1images_678

परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना व्हावी ही मागणी येथील सर्वसामान्य नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय व इतर सुविधा या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीच्या नियमाच्या चौकटीत तंतोतत बसतात. याची संपूर्ण माहितीच अनेकवेळा येथील पुढाऱ्यांनी राज्य सरकारकडे दिली आहे.

परभणीच्या मेडीकल कॉलेजसाठी सरकार सकारात्मक...! परंतू होत का नाही ?

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी परभणीत सांगितले. राज्य सरकार पहिल्यापासूनच परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी सकारात्मक असल्याचे वारंवार घोषित केले जाते. परंतू, त्याची प्रक्रिया इतक्या संथगतीने का होत आहे ? हे न उलगडणारे कोडे आहे.

परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना व्हावी ही मागणी येथील सर्वसामान्य नागरिकांची गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय व इतर सुविधा या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीच्या नियमाच्या चौकटीत तंतोतत बसतात. याची संपूर्ण माहितीच अनेकवेळा येथील पुढाऱ्यांनी राज्य सरकारकडे दिली आहे. त्याचबरोबर राज्य सरकारने त्रिससदस्यीय समिती पाठवून याची इंत्यभूत माहिती ही घेतलेली आहे. 

अहवालाला वर्ष पूर्ण होत आले 
या त्रिसदस्यीय समितीने देखील परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी सकारात्मक अहवाल शासनाकडे दाखल केले आहे. त्यालाही आता वर्ष पूर्ण होत आले आहे. असे असतानाही राज्य शासनाच्या पातळीवर या वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी किंवा स्थापनेसाठी म्हणावे तसे प्रयत्न केले जात नाहीत. कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. अश्या परिस्थितीत परभणी जिल्ह्याला सक्षम आरोग्य यंत्रणा असणे किती गरजेचे आहे. याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. असे असतांनाही या जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी तातडीने पावले उचलून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीला हिरवा कंदील दाखविणे गरजेचे आहे असे येथील सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.

हेही वाचा - बॉयोमिक्सच्या विक्रीतून परभणी कृषी विद्यापीठाने रचला इतिहास  

कुठे घोडे आडले याचा खुलासा होणे गरजेचे 
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे हे सोमवारी (ता.१९) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असतांना त्यांना पत्रकारांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरी संदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावर श्री. टोपे यांनी परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय करण्यासाठी राज्यशासन सकारात्मक आहे असे सांगितले. राज्य शासन सकारात्मक असतानाही मग वेळ का लागतोय हे देखील महत्वाचे आहे. कुठे घोडे आडले याचा ही खुलासा होणे गरजेचे आहे असे येथील जनतेला वाटते.

हेही वाचा - महिन्यापुर्वी उभारलेल्या हमीभाव खरेदी केंद्रात एक किलोचीही खरेदी नाही

कृषी विद्यापीठाची जागा खरच मिळणार का ?
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्रिसदस्यीय समितीने शहरालगत असलेल्या गोरक्षणच्या जागेची पाहणी केली. परंतू त्या जागेऐवजी पुन्हा कृषी विद्यापीठाची जागा घेण्याचा विचार समोर आला. तसे पत्र देखील राज्याच्या कृषी मंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. परंतू, कृषी विद्यापीठाची जागा मिळविण्यात अनंत अडचणीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या मंजुरीची प्रक्रिया अजूनच पुढे ढकलली जाऊ शकते अशी ही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

संपादन ः राजन मंगरुळकर

loading image