- धनंजय शेटे
भूम - धाराशिव जिल्ह्यातील पी एम श्री आदर्श जिल्हा परिषद प्रशाला शाळेची केंद्र सरकारच्या 'पीएम श्री शाळा' योजनेत देशातील सर्वोत्तम ६४४ शाळांमध्ये निवड झालेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास असलेली ही शाळा आधुनिक तंत्रज्ञान आणि शैक्षणिक सुविधांमुळे शिक्षण क्षेत्रात अग्रेसर आहे.