ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे, त्यांनी पीएम किसान ॲप डाऊनलोड करून फेस ई- केवायसी करता येईल, ज्यांना ऑनलाइन बाबत माहिती नाही त्यांनी कृषी सहाय्यक यांना संपर्क करावा.
उमरगा : उमरगा तालुक्यातील पीएम किसानच्या (PM Kisan Yojana)लाभार्थ्यांना योजनेचा पुरेपूर लाभ मिळाला, एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये यासाठी कृषी विभागाने (Agriculture Department) प्रलंबित लाभार्थ्यांनी ई-केवायसी, आधार सेडिंग करण्याची मोहीम हाती घेतली आहे.