Neelam Gorhe : परभणीत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी ₹१,५०० पेक्षा ₹२,१०० रुपये देण्याचा निर्णय लवकरच होणार असल्याचे सांगितले. त्यांनी सरकारी निधीचा योग्य वापर आणि महिलांचे सक्षमीकरण यावर भर दिला.
परभणी : लाडकी बहीण योजनेतून महिलांना सध्या दरमहा दिली जाणारी १,५०० रुपयांची रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याचा निर्णय महायुती सरकार योग्य वेळी घेईल, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शनिवारी (ता.१७) परभणीत स्पष्ट केले.