नांदेडमध्ये रविवारी शासकिय सेवा, योजनांचा महामेळावा

फोटो
फोटो

नांदेड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या किमान कार्यक्रमांतर्गत व  प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक अ. धोळकिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड व डॉ. झाकीर हुसैन शिक्षण संस्था नांदेड यांच्या संयुक्त विद्यमानाने समाजातील गरजु, आर्थिकदृष्टया मागासलेल्या व्यक्तींना, योग्य न्याय मिळण्याच्या उद्देशाने त्यांना देण्यात येणा-या मोफत विधी सेवा, त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या महाशिबीराचे आयोजन रविवार (ता. दोन फेब्रुवारी 2020) हजरत फातेमा मुलींचे ऊर्दु हायस्कुल गाडेगाव रोड, देगलुर नाका, नांदेड येथे आयोजन करण्यात आले आहे.

या महाशिबीरात अटल पेन्शन योजना,  मतदार नोंदणी, ऑनलाईन प्रमाणपत्र, नविन रेशनकार्ड, रेशन कार्डमधील नावात दुरुस्ती, नविन आधारकार्ड नोंदणी / दुरुस्ती, उत्पन्न दाखला, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना, राष्ट्रीय कुंटूंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना, संजय गांधी निराधार योजना, आयुष्यमान भारत योजना,  माता व बालसंगोपन कार्यक्रम योजना, विविध योजना, महसूल खातेफोड, उतारा दाखले, पशुसंवर्धन योजना, एसटी महामंडळ योजना, आर.टी.ओ. कार्यालयाच्या विविध सेवा, कृषी विभागाच्या योजना, पंतप्रधान जनआरोग्य योजना, सामाजिक न्याय विभागाच्या योजना, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या योजना, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजना, प्रधानमंत्री आवास योजना इत्यादी सर्व शासकिय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या योजनांचा याशिबीरात नागरिकांना प्रत्यक्ष त्या ठिकाणीच लाभ मिळणार आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे आवाहन

या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी नांदेड शहर व नांदेड तालुक्यातील नागरिकांनी आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, फोटो, इत्यादी कागदपत्रे येतांना सोबत आणावे व लाभाथ्र्यांनी सदरील शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधीकरणचे दिपक अ. धोळकिया व जिल्हा प्राधीकरणचे सचीव तथा न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी केले असुन हे महाशिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

एसटी बसवरील देवदेवतांच्या चित्रांची विटंबना थांबवा

नांदेड : राज्य परिवहन महामंडळमार्फत नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या विठाई नावाच्या बसेसवर विठ्ठल माऊलीचे व दींडीचे चित्रिकरण करण्यात आले आहेत. पण त्या बसमध्ये बसलेल्या प्रवाशांकडून त्या चित्रांची अनावधनाने विटंबना होत आहे ही ताबडतोब थांबवावी, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस माधव चिंचाळे यांनी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली. 
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, रा. काँ. शहर अध्यक्ष सुनील कदम, रायुकाँ.चे जिल्हाध्यक्ष रउफ जमीनदार ,अमेर बिल्डर, जम्मू भाई आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com