उदगीर तालुक्यातील तब्बल 48 मतदान केंद्र संवेदनशील घोषित

युवराज धोतरे
Thursday, 14 January 2021

पंचावन्न ग्रामपंचायतीपैकी अठ्ठेचाळीस मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

उदगीर (लातूर) : तालुक्यात सुरू असलेल्या एकसष्ठ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत होत असलेल्या पंचावन्न ग्रामपंचायतीपैकी अठ्ठेचाळीस मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यावर लक्ष ठेवण्यासाठी तीन नायब तहसीलदारांच्या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याची माहिती निवडणूक नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी दिली आहे.

तालुक्यात प्रत्यक्षात निवडणूक सुरू असलेल्या पंचावन्न ग्रामपंचायतीमधील हंडरगुळी चार, हाळी चार, हेर दोन, बेलसकरगा तीन, निडेबन दोन, येनकी तीन, लोहारा तीन, वाढवणा खू, तीन वाढवणा बु तीन, शेल्हाळ दोन, किनी यल्लादेवी तीन, कुमठा (खु) चार, गुडसुर चार, दावणगाव दोन, नळगीर पाच हे संवेदनशील मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून या केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Gram Panchayat Election: तिळ गूळ घ्या मत आम्हालाच टाका; महिला उमेदवारांची प्रचारात नवी शक्कल

उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, उपविभागीय पोलिस अधिकारी डॅनियल बेन, तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता. १३) बैठक पार पडली. या बैठकीत सर्व स्वामी दानशील मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवणे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राखण्यासाठी नायब तहसीलदार संतोष गुट्टे, प्रज्ञा कांबळे, संतोष धाराशिवकर ह्या तिघांचा टास्क फोर्स बनवण्यात आला आहे. शिवाय व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

या संवेदनशील मतदान केंद्रांतर्गत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना पोलीस विभागाच्या वतीने नोटिसा देऊन कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी महसूल विभाग व पोलिस प्रशासन दक्ष आणि सज्ज करण्यात आल्याचेही श्री गुट्टे यांनी सांगितले.

हेही वाचा - केळी पीकविमा मंजुरीचे कृषी आयुक्तांचे आदेश, डोंगरकडा सर्कलमधील शेतकऱ्यांना दिलासा

आचारसंहिता कक्ष कोमात-
या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेला आचारसंहिता कक्ष कोमात असल्याचे दिसून येत आहे. या पक्षाची जबाबदारी गटविकास अधिकारी यांच्याकडे असून अनेक ठिकाणी आणि गावात सार्वजनिक ठिकाणी बॅनर पोस्टर लावण्यात आले असले तरीही कुठलीच कार्यवाही केली गेली नसल्याचे दिसून आले.तक्रार आल्यानंतरच आम्ही कारवाई करणार असा पवित्रा या कक्षाने घेतल्याने अनेक ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आहे.

(edited by- pramod sarawale)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election 48 polling stations Udgir declared sensitive